
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
सातारा.दि .१३. सातारा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक युवती आणि महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 ऑगस्ट रोजी सातारा शहरातील एक युवती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे.
दुसऱ्या घटनेत सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी महिला घरातून मी राजवाडा येथून भिशीचा हप्ता भरून येते, असे सांगून निघून गेली आहे.