स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
सातारा. दि.३१. टीव्हीएस क्रेडीट ब्रँच कोल्हापूर येथे ओळख असल्याचे सांगून एकाने वेळोवेळी २ लाख रुपये घेवून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
दि. १८ जून २०२३ ते २० जून २०२३ या दरम्यान हा प्रकार घडला असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमिर कासिम हेळवाककर (वय ३३, रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, शोएब महमंद शेख (रा. सदरबझार, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शितोळे तपास करत आहेत.