
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-
सातारा.दि.३१.येथील मल्हारपेठेत घरातील बेडरुमच्या खिडकीशेजारी ठेवली पर्स चोरुन त्यातील तब्बल २ लाख ६३ रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञानाने लंपास केले.
ही घटना दि. २९ रोजी रात्री ७.५४ ते दि. ३० रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक गणेश चंद्रकांत नाईक (वय ४१, रा. चिरायू हॉस्पिटल शेजारी, राधिका रस्ता, मल्हारपेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची बहिण मिथीला सुदीप नाईक यांची ती पर्स होती. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.