
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
कुडाळ. दि.०८.कुडाळ ता. जावली परिसरातील मुलांना शिक्षणासाठी पाचवड ,सातारा बाहेर गावी जायला लागते.त्यासाठी कुडाळ येथे अबॅकस क्लासेसचा आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
लहान मुलांच्या मध्ये (वयोगट ४ते१४ वर्षे) बौद्धिक विकास, एकाग्रता, आत्मविश्वास, अंकगणित, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच मुलांमधील एकाग्रता, आकलनशक्ती, श्रवणशक्ती व स्मरणशक्ती वाढते,मुलांचे डावा व उजवा मेंदू अधिक तल्लख होतो,मुले शालेय विश्वातील सर्व विषयांत सर्वांगीण विकास साधुन प्रगती मिळवु शकतात.या बहुउद्देशाने कुडाळ येथे अबॅकस व वैदिक मॅथ्स,वेदीक मॅथ्स,फोनिक, हॅण्डरायटींग क्लासेसचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपली बौद्धिक क्षमता वाढवावी तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांना अश्याप्रकारे अबॅकस चे शिक्षण द्यावे, असे आवाहनस्टेप अपच्या सी.ई.ओ. राजश्री पाटील,राजीव पाटील, राहुल ननावरे,कोमल पवार,शितल नलावडे,अश्विनी पवार यांनी बोलताना व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या.शिक्षिका कोमल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळेस या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास कुडाळ गावातील राहुल ननावरे,महेश पवार, प्रशांत नायकवडी,गणेश कदम,शंकर मदने,दिपिका मॅडम,शितल मोरे उपस्थित होते.