स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- अजित जगताप सातारा
सातारा दि:०३.महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारी संघटना म्हणून जय होलार सामाजिक सेवाभावी संस्था ठाणे यांच्याकडे पाहिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेचे जाळे विणले असून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ,भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वि दा. आयवळे शिवाजी हत्तेकर यांच्या विचारधारेतून उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होलार सेवाभावी संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी सातारचा ढाण्या वाघ व होलार समाजाचा खंदा समर्थक हनुमंत खांडेकर रा. शनिवार पेठ सातारा यांची निवड करण्यात आली .
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख होणार समाजाचे नेते खांडेकर
त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे. होलार सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार नामदास ,सचिव चंद्रकांत नामदास ,कार्याध्यक्ष धर्मेंद्र नामदास, खजिनदार गणेश नामदास, पत्रकार भारत जगताप यांच्यासह लोहार समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये होलार समाजाच्या न्याय हक्कासाठी हनुमंत खांडेकर झटत आहेत. लवकरच सातारा शहरांमध्ये होलार भवन बांधण्याचे दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व होलार बांधवांनी विचार विनिमय करावा. असे आवाहन हनुमंत खांडेकर यांनी केले आहे.