
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
शब्द संपदा हीच शब्द सभ्यता घडवते
शिवाजी राऊत भाषा अभ्यासक यांचे विचार
केळघर.दि.०६. समाजातील संघर्ष आणि समस्या या शब्द न समजल्यामुळे शब्दांच्या गैरवापरामुळे शब्दांचे महत्त्व न कळल्यामुळे निर्माण झाले आहेत त्यासाठी शब्दांची सभ्यता व शब्दांचे राजकारण हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच वाचनातून समजावून घेण्याची गरज आहे त्यासाठी वाचन महोत्सव हा त्यासाठी आवश्यक असून
समाज, , शिक्षक व पालक यांनी वाचन महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व दिले पाहिजे. असे उद्गार भाषाभ्यास शिवाजी राऊत यांनी काढले
रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय केळघर येथील पाच सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थी शिक्षक दिन व वाचन महोत्सव या संयुक्त कार्यक्रमात राऊत बोलत होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिंदे एस बी मदने ए यु जाधव जाधव एल व्ही दांडेकर पी एस आहेर ए एम हे मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इयत्ता दहावीच्या 2024 25 या बॅचच्या विद्यार्थिनी श्रेया ओंबळे वेदांतिका पाढळे श्रुती गाढवे. समीक्षा पवार श्रेया माने स्वरा गाढवे सृष्टी शेलार या विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त अध्यापनाच्या केलेल्या कामाबद्दलचे अनुभव कथन केले या दिवशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सृष्टी शेलार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते, विद्यार्थिनींनीच निवेदन प्रस्ताविक व आभार मानले शिक्षक दिनानिमित्त अध्यापन केलेल्या विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना गुलाब पुष्प भेट देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षकांचे प्रति कृतज्ञता श्रीमती जाधव ही ए तसेच प्रभारी मुख्याध्यापक शिंदे एसबी या शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या प्रती आभाराची भाषणे केली एकूणच शिक्षक दिन हा विद्यार्थी शिक्षक आनंदाचा वंदन करण्याचा दिवस असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
वाचन महोस्तवाच्या कार्यक्रमात भाषा विचार शिक्षण व प्रत्याभिज्ञा या पुस्तकाच्या प्रति विद्यालयाला प्रारंभीच भेट देऊन राऊत आपल्या भाषणात म्हणाले की शब्दांमध्ये जग आहे दिसणारे जग हे शब्दांचे आहे शब्दांच्या जगात अर्थ आहे अर्थांचा अर्थ समजून घेणे हे शिक्षण आहे शिक्षण शब्दाशिवाय नाही शब्द प्रभावी वापरणे शब्द समजून घेणे शब्द अभिव्यक्त करणे हीच निरंतर क्रिया शिक्षण क्षेत्रात चालू असते विद्यार्थी माहिती गोळा करतात पण शब्द आणि अन्वयार्थ आणि वापर याबद्दल सजग वर्तन करत नाहीत अशी खंत व्यक्त करून राऊत म्हणाले की शब्दांचे वेडे विद्यार्थी तयार करणे हे शिक्ष काचे काम आहे.
वाचन हा कंटाळा नाही वाचनात त्रास नाही तर वाचन हा ग्रंथालयातील साधनेचा आयुष्यभर निरंतर करावयाचा ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न आहे सर्व शाळांच्या मधील विद्यार्थी मैदान आणि ग्रंथालय आणि प्रयोगशाळा इथे रमले पाहिजेत इथे आले पाहिजेत खेळले पाहिजेत तर शिक्षणाची प्रक्रिया गतिमान होते विद्यार्थ्यांच्या हातात चरित्र नायकांची पुस्तके सजगपणे दिली पाहिजे त्यांना धार्मिक वांग्मय वाचण्यापासून अलिप्त ठेवले पाहिजे तरच विद्यार्थी हे वर्तमान समजावून घेऊ शकतात नव्या शिक्षणात परिसर अभ्यास परिसर गरजा आणि परिसर उद्योग याची रचना केलेली आहे म्हणून आजच्या शाळांनी विद्यार्थ्यांना परिसराचे सर्वांकष भौगोलिक नैसर्गिक व जल पर्यावरणाचे भूरचनेचे ज्ञान सतत दिले पाहिजे तरच विद्यार्थी हा स्थानिक भूगोल स्थानिक इतिहास स्थानिक कृषी संस्था स्थानिक रोजगार याबद्दलचे ज्ञान मिळवता येऊ शकते आगामी शिक्षणातील या सगळ्या ज्ञान व्यवहाराला सामोरे जाण्यासाठी वाचनाशिवाय दुसरा मार्ग नाही विचार करता येण्यासाठी वाचनाची साधना मुलांना विद्यार्थी दशेपासूनच करण्याची गरज असते याचे महत्त्व प्रतीत करून देणे ही शाळांची जबाबदारी आहे शिक्षकांचे ज्यादा शिकवणे आणि ज्यादा वाचनाला प्रवृत्त करणे यामध्ये वाचन प्रवृत्त मुलांना करणे याला महत्त्व आहे हेच आजच्या वाचन महत्त्वाच्या निमित्ताने विद्यार्थी पालक शिक्षक समजून घेतील तर वाचन महोत्सवाची महती ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यास मदत होईल असेही राऊत यांनी शेवटी सांगितले.
विद्यार्थी दिनाच्या दिवशी शिक्षिका म्हणून भूमिका पार पाडलेल्या श्रेया ओंबळे वेदांतिका पाडळे श्रुती गाडवे, समीक्षा पवार श्रेया माने स्वरा गाडवे या सर्वांचे विशेष आभार मानून भैरवनाथ विद्यालय केळघर येथे आयोजित करण्यात आलेला शिक्षक दिन व वाचन महोत्सव संपन्न .