स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
संकल्पनात्मक ज्ञानाकडे जाण्यासाठी वाचनाशिवाय उपाय नाही .. शिवाजी राऊत
मेढा दि.०६. शिक्षण ही अक्षर मैत्री समजावून घेतली पाहिजे. विद्यार्थी स्मरण करतात लेखन करतात भाषण करतात पण शब्दांचे उपयोजन समजावून घेत नाहीत वाचन महोत्सव हा शब्दांचे महात्म्य समजावून देण्यासाठी आहे या महोत्सवामध्ये शब्द मैत्री वाचन मैत्री लेखन मैत्री विद्यार्थ्यांनी करायला हवी ती कायम पणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवायला हवा यातूनच विद्यार्थी हे अभिव्यक्तीकडे संकल्पनात्मक ज्ञानाकडे पुढे पुढे विकसित होऊन जाऊ शकतात त्यासाठी विद्यार्थी हे अक्षर मित्र बनले पाहिजेत असे उद्गार भाषाभ्यासक शिवाजी राऊत यांनी यांना हायस्कूल येथील वाचन महोत्सवात व्यक्त केले.
स्वामी शिक्षण संस्थेच्या मेढा येथील वाचन महोत्सवाच्या कार्यक्रमात राऊत हे बोलत होते विचार मंचावर सौ वायदंडे मॅडम साबळे सर कदम सर पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी शब्दांची उपासना केली आहे याची आठवण करून देऊन राऊत म्हणाले की ज्ञानोबा आणि तुकोबा यांचा नाम गजर महत्त्वाचा आहेच पण त्याहीपेक्षा त्यांनी आपल्या अभंगातून वापरलेले संपन्न आशियाचे भिन्न शब्द विद्यार्थी दशेत समजावून घेतले तर संदेशाकडे ज्ञानाकडे समाज जाऊ शकतो विद्यार्थी दशेत हा शब्द संग्रह हा अर्थ विश्लेषणाचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी सतत करायला हवा त्यासाठी वाचनाचा छंद वाचनाचे महत्त्व त्यांना पटवून देण्याची गरज आहे विद्यार्थी हे अस्थिर असतात एकाग्र बनवण्यासाठी वाचनाचा उपयोग होतो वाचन हे विद्यार्थ्यांना विकसित करते त्यांचे व्यक्तिमत्त्व संतुलित करते समाज जीवनातील असंख्य प्रकारची माहिती वाचनातूनच मिळते समृद्ध व्यक्तिमत्वासाठी वाचनाशिवाय दुसरा मार्ग नाही असे सांगून राऊत म्हणाले की अक्षरे हा इतिहास असतो अक्षरे ही वर्तमान असतात अक्षरे हे निरीक्षण असते अक्षरे हे अनुभव असतात म्हणून विद्यार्थ्यांना वाचन महोत्सवामधून हे महत्त्व शाळांनी पटवून देण्याची गरज आहे.
आपली मैत्री वस्तूची असते देव घेव आपला स्नेह वाढतो पण त्यामध्ये बदल करायला हवा आपली मैत्री ग्रंथाद्वारे वाचनाद्वारे चर्चेद्वारे विकसित झाले पाहिजे ग्रंथ हे निरपेक्ष मित्र असतात ते अबोल असतात ते नेहमी वाचकांना खुणावत असतात त्यांना हातात घेतले की अक्षरांचा आणि वाचकाचा संवाद सुरू होतो असे सांगून राऊत म्हणाले की चला आपल्या विद्यार्थी दशेतच मुक्तीच्या वाटा ग्रंथालयामध्ये शोधूया प्रयोगशाळेत प्रयोग करूया निरीक्षण निष्कर्ष हे ज्ञानाचे कौशल्य आत्मसात करूया यासाठी वाचन महोत्सवाला आनंद महोत्सव बनवूया असे सांगून राऊत यांनी वेनंना हायस्कूल मेढा विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची महत्त्व विशद करणारे वाचन गोडी लावण्यास उपयुक्त ठरणारे स्वलिखित भाषा विचार शिक्षण व प्रत्यभि ज्ञान हे पुस्तक पाच प्रति भेट दिल्या व्याख्यानाचा समारोप करताना हम बच्चे है हम सच्चे है हम पडेंगे हम लिखेंगे हम गायेंगे या घोषणा दिल्या वाचणाऱ्या मुलांचा विजय असो या घोषणेने विद्यालयाचा परिसर दणाणून गेला अत्यंत उत्साह पूर्ण विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून प्रतिसाद दिल्या आणि विद्यालयात अक्षरांचा आनंद सोहळा उस्फूर्त व्याख्यानाच्या श्रवणाने संपन्न झाला.
वेण्णा हायस्कूलचे शिक्षक कदम सर यांनी सर्वात शेवटी विद्यार्थी शिक्षक व व्याख्याते या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला