क्राईमसातारा

मेढा पोलिस स्टेशन हद्दीतील सहा जण हद्दपार

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——


मेढा.दि.११.   सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मेढा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मेढा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एकून सहा गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.


या बाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षकं श्रीमती.वैशाली कडूकर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचिम, यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना मेढा पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या होत्या.यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडणेकरीता तसेच जावली तालुक्यात शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकरीता प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे मेढा पोलीस ठाणे रेकॉर्डवरील नितीन राजेंद्र लोखंडे रा. कुडाळ ता. जावली,तन्वीर हमिद पठाण रा.जवळवाडी ता.जावली,मंगेश भरत निकम रा.करंदी ता.जावली,गणेश विष्णु धनावडे रा.करंजे ता.जावली,आकाश विठ्ठल आगलावे रा.बिभवी ता.जावली अतुल रमेश खटावकर रा.कुडाळ ता.जावली यांचे विरूद्ध प्रतिबंधक कारवाई करणे कामी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने कारवाई करत जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी एकूण सहा सराईत आरोपीना हद्दपार करणे बाबत आदेश पारीत केला आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये सदर आरोपीना मेढा पोलीस ठाणे हद्दीतून दि.१८/९/२०२४ अखेर हद्दपार करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!