
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा.दि.२२. ५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सन २०२५ पुणे ग्रामीण (बारामती) मध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पुरुष व महिला संघाने सर्वोत्तम कामगिरी करुन सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.
पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर बारामती येथे पार पडलेल्या ५१ व्या कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पुरुष संघाने वैयक्तीक क्रिडा प्रकारामध्ये ५७ सुवर्ण,२३ रजत व १३ कांस्य पदक असे एकुण ९३ पदके व सांघीक क्रिडा प्रकारामध्ये व्हॉलीबॉल, खो-खो, क्रॉसकंट्री मध्ये विजेते पद, फुटबॉल मध्ये उपविजेते पद व हॉकी, हॅन्डबॉल मध्ये तृतीय क्रमाक प्राप्त करुन एकुण २०७ गुणासह पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करुन सलग तीन वर्षे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करुन विजयाची हॅट्रीक केलेली आहे.
तसेच महिला संघाने वैयक्तीक क्रिडा प्रकारामध्ये ४६ सुवर्ण, २३ रजत व ०८ कांस्य पदक असे एकुण- ७७ पदके व सांघीक क्रिडा प्रकारामध्ये कबड्डी मध्ये विजेते पद, खो-खो, बास्केटबॉल मध्ये उपविजेते पद व व्हॉलीबॉल क्रॉसकंट्री मध्ये तृतीय क्रमाक प्राप्त करुन एकुण १६४ गुणासह महिला गटाचे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व पदक प्राप्त खेळाडु, स्पोर्ट इन्चार्ज- सुनील सपकाळ, सॅम्युअल भोरे, सपोटींग स्टाफ व प्रशिक्षक यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल श्री. पोलीस अधीक्षक तुषार दोषी ,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप-अधीक्षक (गृह) अतुल सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग सुनिल साळुंखे, सपोनी वानिशा अभिजीत यादव, रापोउपनि अति.कार्य.सुशिल कदम,परि.मपोउपनि फलटण शहर श्रीमती आयोध्या घोरपडे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच यापुढे होणा-या स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.



