महाराष्ट्रसातारासामाजिक

विश्वंभरबाबा पायी दिडीचे आळंदी कडे प्रस्थान

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अनिल धनावडे 

मेढा.दि.२१. प्रती वर्षी प्रमाणे विश्वंभरबाबा पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान जावळीची राजधानी मेढा नगरीतुन आळंदीकडे झाले.वै.ह भ प गुरुवर्य भिकोबा महाराज देशमुख यांच्या प्रेरणेने व त्यांचे नातू ह भ प गुरूवर्य अतुलजी महाराज देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा दिंडी सोहळा गेले २७ वर्षांपासून कार्यरत आहे.आद्य प्रवर्तक वै.गुरुवर्य भिकोबा महाराज हे मुळचे गांजे या गावचे असून पीढिजात वारकरी होते अगणीत भावीकांना पवित्र तुळशी ची माळ घालून सन्मार्गावर प्रव्रूत केले सर्वांना तसेच सर्व वारकरी बांधवांना बरोबर घेऊन १९९६ साली हा दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर जाऊ लागला.

प्रथम बैलगाडी या माध्यमातून चालत होता खुप खडतर प्रयत्नातून हा दिंडी सोहळा चालू झाला कुठे लाईटची सोय नसेल पालांची सोय नसेल वाहनसोय नसेल असं असताना ही वारी कधीही खंडीत झाली नाही अखंडच राहिली महाराजांच्या या कार्यात सर्वात मोलाचा वाटा म्हणजे त्यांच्या सौ वै.अनुसया भिकोबा देशमुख यांचा होता.तद्नंतर त्यांचे चिरंजीव भजन सम्राट तुकारामजी देशमुख यांनी या आध्यात्मिक परंपरेला पुढे चालवण्याचे काम हाती घेतले या कुटुंबाच्या माध्यमातून तमाम जावली करांना हाती घेऊन हे कार्य पुढे चालू राहीले. आणखी आता ” माझ्या वडिलांची मिरासी गां देवा! तुझी चरण सेवा पांडूरंगा!! या संत वंचना प्रमाणे हिच परंपरा त्यांचे नातू विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह भ प गुरूवर्य अतुल महाराज देशमुख पुढे चालवत आहेत.याच्या मध्ये त्यांच्या पत्नी ह भ प सौ सिताताई अतुल देशमुख यांची त्यांना भरपूर साथ आहे.आज हि परंपरा पुढे ही चालू रहावी यासाठी मेढा येथे विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आध्यात्मिक व शालेय शिक्षण विनामूल्य तत्वावर दिले जाते.

आज या ऐतिहासिक दिंडी सोहळ्याचे प्रस्थान जावळीची राजधानी मेढा येथून झाले प्रसंगी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष नारायण धनावडे उपाध्यक्ष तुकरामजी देशमुख.अंजनाताई भोसले. सभापती ह भ प जयश्रीताई गिरी मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ,माजी उपाध्यक्ष दत्ता आण्णा पवार,अँड. शिवाजी राव मर्ढेकर दिंडीचे विणेकरी ह भ प शिवराम महाराज मोरे चंद्रकांतजी घोरपडे.पोलीस निरिक्षक आदरणीय अमोल माने सर विलास आंबा पवार सरपंच परिषद जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी अखील भारतीय वारकरी मंडळाचे सचिव सुनिल आण्णा धनावडे तसेच जावळी तालुक्यातील सर्व वारकरी भावीक उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!