आमदार मकरंद पाटील यांच्या विकास निधीतून व जिल्हा बॅंक संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या प्रयत्नातून कासवंड येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संजय वांगडे
कुसुंबी प्रतिनिधी.दि.१४ जून २०२२ रोजी कासवंडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मकरंद आबा पाटील यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचा नारळ फोडण्यात आला. कार्यक्रमासाठी भव्य मोटारसायकलची रॅली काढून राष्ट्रवादीने आपले शक्तिप्रदर्शन केले. विकासकामांमध्ये ग्रामपंचायत ऑफीससाठी १० लाख, चोरमलेवाडी रस्ता १५ लाख, हिरवेवाडी रस्ता १५ लाख,गोळेवाडी रस्ता १५ लाख रूपये अशा प्रकारे सुमारे सव्वा कोटी रूपयांच्या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरपंच श्री.जनार्दनजी चोरमले यांनी ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज निर्माण केले त्याप्रमाणेच स्व.बाळासाहेब भिलारेदादा यांचे स्वप्न आपण सर्वजनांनी पूर्ण केले पाहीजे असे मत व्यासपीठावरील मान्यवरांसमोर व्यक्त केले. पंचायत समिती महाबळेश्वर सभापती आदरणीय श्री.संजय(बाबा)गायकवाड यांनी तालुक्यातील जनतेचा राष्ट्रवादीवरील असलेला विश्वास आणि राष्ट्रवादीने केलेला विकास याला तोड नाही असे मत व्यक्त केले. पुढील वीस वर्षे कामे पुरतील असा तालुक्याचा विकास आराखडा आदरणीय दादांनी बनवला असल्याने राष्ट्रवादी पक्षाला तालुक्याचा विकास करण्यास अडचन येणार नाही असेही ते आपल्या भाषणात बोलले. दरम्यान जिल्हा बॅंकेचे संचालक श्री.राजेंद्रशेठ राजपुरे यांनी भविष्यातील विकासकामांचाही उल्लेख केला तसेच तालुक्यात चालत असलेला राष्ट्रवादीचा विकास रथ कधीही थांबणार नाही याची जनतेला ग्वाही दिली.
कार्यक्रमासाठी आदरणीय दादांचे चिरंजीव श्री.नितीन भिलारे, समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.प्रवीण भिलारे पांचगणी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.श्री.सतिश पवारसाहेब ग्रामसेवक श्री. विजय राजपुरे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.आनंदा पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री.बापू पवार, उपसरपंच श्री.रमेश पवार अखिल भारतीय वारकरी संप्रदाय महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्ष श्री.श्रीरंग पवार मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब दानवले गुरूजी ग्रामपंचायत सदस्य श्री.निलेश गोळे, सौ.प्रियंका पवार,सौ.छाया चोरमले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सचिन चोरमले, सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनिल पवार,श्री.तुकाराम पवार,श्री.बिपीन पवार,श्री.विकास पवार,श्री.एकनाथ गोळे श्री.बाळू हिरवे श्री.श्रीकांत पवार श्री.गणेश पवार श्री.वसंत चोरमले सुभेदार श्री.दिलीप पवार,श्री.गणेश ढेबे,श्री.आनंदा पां.पवार, श्री.गणेश स.पवार,श्री.गणपत पवार,श्री.संदिप पवार,श्री.विठ्ठल का.पवार,श्री.नारायण पवार,श्री.शांताराम पवार,श्री.आनंदा पाडळे,श्री.पांडुरंग पवार,श्री.दिनकर उंबरकर,श्री.बाजीराव उंबरकर,श्री.हनुमंत उंबरकर,श्री.आनंदा चोरमले,श्री.बबन धामुणसे,श्री.भाऊसाहेब चोरमले आदी मान्यवर व ग्रामस्थ मंडळ कासवंड(चोरमलेवाडी,गोळेवाडी,हिरवेवाडी,धामुणसेवाडी), तंटामुक्ती कमिटी कासवंड व महिला बचत गट कासवंड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी कासवंड गावचे पोलीस पाटील श्री.दत्तात्रय र.पवार यांनी सर्वांचे आभार मानले.



