महाराष्ट्रसातारासामाजिक

जोशी जंपाला फाउंडेशनच्या वतीने शाळांस भरघोस मदत…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

कास.दि.२१. दुर्गम कास परिसरात वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवीमुरा व शिंदेवस्ती या दोन शाळांना सातारा एमआयडीसी मधील जोशी जंपाला इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने व जोशी जंपाला फाउंडेशनच्या सहकार्यातून भरघोस अशा शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. नुकतेच हे साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम सांगवीमुरा येथे संपन्न झाला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल बर्गे, उपाध्यक्ष अग्रन्य जंपाला, खजिनदार अभिजित गायकवाड, सचिव संतोष जाधव, सदस्य संजय साळुंखे, दिपक जाधव, निवास साबळे, मनोज साबळे, एन. आर. जाधव, अमोल सावंत, गांजे केंद्राचे केंद्रप्रमुख विजयकुमार देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत पवार, दत्तात्रय सरगर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

यावेळी बोलताना अध्यक्ष अनिल बर्गे म्हणाले, ग्रामीण, दुर्गम भागातील शाळांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन वेगळं समाधान मिळत आहे. येथील मुले ही शिकून यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य यापुढे केले जाईल. उपाध्यक्ष अग्रन्य जंपाला म्हणाले, कंपनीच्या वतीने हे साहित्य म्हणजे छोटीशी भेट असून दुर्गम खेड्यातील मुले ही शहरातील मुलांच्या तोडीची व्हावीत, अभ्यासच नाहीतर कला, क्रिडा क्षेत्रात ही मुले प्रगत व्हावीत. यापुढे फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळांना ज्यावेळी गरज असेल तेव्हा मदत करू. यावेळी संजय साळुंखे, विजयकुमार देशमुख, संतोष जाधव, सुर्यकांत पवार यांनी आपले विचार मांडले.

यावेळी शाळांना एक कपाट, दोन टेबल, सहा खुर्च्या, एक संगणक, बावीस मुलांना स्कूलबॅग, वह्या, पेन, पाणी बाॅटल, गोष्टीची पुस्तके, क्रिकेट, फुटबॉल, व्हाॅलीबाॅल, कॅरम, दोरउड्या, रिंग, बुद्धीबळ आदी खेळांचे साहित्य अशा भरघोस साहित्याची भेट जोशी जंपाला फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली. दिलेल्या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुनिल जांभळे यांनी आभार मानले. प्रास्ताविक दत्तात्रय सरगर यांनी केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!