महाराष्ट्रसातारासामाजिक

मेढा नगरपंचायतीच्या वतीने प्लास्टिक वापर बंदी करणेबाबत व्यापारी वर्गास सूचना

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

मेढा. दि.०२  मेढा नगरपंचायतीच्या वतीने मेढा बाजार पेठेतील व्यापारी वर्ग तसेच गावातील दुकानदार यांना प्लास्टिक वापर बंदी करणेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

नुकत्याच शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या जाहिर आवाहन नुसार नागरिक,व्यापारी वर्ग यांना प्लास्टिक पिशव्या वापराबाबत बंदी घालण्यात आली असून या नियमाचा भंग केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा मेढा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार यांनी केला आहे.स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मेढा नगरपंचायत कडून प्लास्टिक बंदी च्या अनुषंगाने शहरातील सर्व आस्थापना यांना भेट देण्यात आली. मेढा शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरत असलेल्या सर्व आस्थापना यांना बंदी बाबतच्या सूचना देऊन प्लास्टिक जप्त करण्यात आले व दंडात्मक कारवाई बाबतच्या सूचना देण्यात आल्या.पर्यावरण संवर्धन करण्याच्या अनुषंगाने शहरातील सर्व आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिक चा वापर करणे टाळले पाहिजे, पर्यायी कापडी पिशवी तसेच कागदी पॅकिंग तसेच पुनर्वापर योग्य प्लास्टिक (१०० मायक्रॉन च्यावरील पिशवी ) चा वापर करावा असे आवाहन मेढा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार यांनी केले आहे.

या जनजागृती मोहिमेत मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार ,शहर समन्वयक सचिन घाटुळे, नोडल अधिकारी प्रमोद कुंभार, मंगेश गोरे,प्रसाद बटवाल,पापा पानसरे,राजेश पुजारी,संजय जवळ,आशिष कुंभार,शुभम जवळ आदीनी सहभागी होत मेढा बाजार चौक, बाजार रोड.वेण्णा चौक, एस. टी.डेपो परिसरात अनेक दुकानदार,तसेेच भाजीपाला व्यापारी वर्ग,विक्रेते यांना प्लास्टिक वापर बंदी बाबत सूचना देण्यात आली.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!