महाराष्ट्रशैक्षणिकसातारासामाजिक

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ

मेढा.दि.२९.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समाजाला नवीन दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदा त्यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. याचा प्रत्यय त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून दाखवून दिला. स्त्री शिक्षणामुळे आज मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व मिळवले आहे.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शाळा महाविद्यालयात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. त्यांनी अनेक ग्रंथांचे लिखाण करून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कृतीची जोड दिली पुणे या ठिकाणी असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा आजही आपणाला तत्कालीन गोष्टींची जाणीव करून देतो. शेती संदर्भात त्यांनी विविध प्रयोग करून शेतीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच त्यांना महात्मा ही पदवी मिळाली.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भोसले तर आभार इतिहास विभाग प्रमुख श्री. शंकर गेजगे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील 35 विद्यार्थी – विद्यार्थिनी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!