जावली शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जि.प.प्राथमिक केळघर शाळेला यश


केळघर.दि.२१. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत पंचायत समिती जावली मेढा शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय खाशाबा जाधव स्पर्धा २०२२ आणि २३ या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर चा विद्यार्थी 35 किलो वजनी गटात तालुक्याचा हुकमी एक्का पुनवडी गावचे सरपंच पै.सुरेश सखाराम पार्टे यांचा चिरंजीव साईराज सुरेश पार्टे इ.७ वी याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

केळघर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.हंबीरराव जगताप,मुख्याध्यापक श्री. संपत सुर्वे सर, क्रिडा शिक्षक श्री.विजय जुनघरे सर,सर्व शिक्षक स्टाफ,कुस्ती कोच श्री. सुरेश पार्टे यांनी साईने मिळवलेल्या या यशासाठी खुप परिश्रम घेतले होते.

तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आज प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल साई सुरेश पार्टे याचा केळघर शाळेचे मुख्याध्यापक संपत सुर्वे, शंकर जांभळे गुरुजी,सर्व शिक्षक तसेच केळघर शाळा कमिटी व ग्रामस्थ मंडळ केळघर यांच्या वतीने साईराजचे अभिनंदन व कौतुक करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या.



