महाराष्ट्रसातारासामाजिक

जिल्हा प्रशासन बचत गटांना
सर्वतोपरी सहकार्य करणार …जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

सातारा, दि. २४ : जिल्हा प्रशासन बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे आयोजित नव तेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी नीता शिंदे-चौधरी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय अधिकारी विलास बच्चे आदी उपस्थित होते.

दोन वेगवेगळ्या विभागांनी एकत्रित प्रदर्शन घेऊन अभिनव उपक्रम सुरू केल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, महिला बचत गटांनी या प्रदर्शनामध्ये ठेवलेली उत्पादने दर्जेदार आहेत. या प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी घेण्यात येऊन महिला बचत गटांना विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे ही ते म्हणाले.या प्रदर्शनात १३५ बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये विविध प्रकारचे मसाले, चटण्या, पापड, पीठं, कडधान्ये, लोणचे, सांडगे, कुरडई, शेवई, सेंद्रीय गूळ, चकली, नानकेट, बिस्कीटे, पिशव्या, पर्स, मातीची भांडी, लाकडी कलाकुसर, लोकरीच्या वस्तू, फ्रेम्स, इंद्रायणी तांदूळ, इमिटेशन ज्वेलरी यांच्या स्टॉल्सचा समावेश आहे. हे प्रदर्शन व विक्री दि. २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार आहे. तसेच रोज सायंकाळी विविध मनोरंजन व प्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शन उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विजय डोके यांनी केले व वन विभागाचे श्री ताकवले यांनी आभार व्यक्त केले.


जितेंद्र जगताप वृत्तसंपादक जागर वृत्त, सातारा.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!