क्रीडामहाराष्ट्रसातारा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,कबड्डी संघाचा प्रथम क्रमांक

स्टार ११ महाराष्ट्र न्युज युवराज धुमाळ

मेढा.दि.२४.जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, नेहरू युवा मंडळ सातारा व यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क जाकातवाडी सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.

या कबड्डी स्पर्धा सातारा येथील शाहू स्टेडियम येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता.त्यावेळी अटीटतीच्या व रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून,प्रथम क्रमांक प्राप्त केला.

महाविद्यालयातील रोहित जाधव, राजेश देशमुख, कार्तिक कासार, ओमकार शेलार, प्रमोद जाधव,अभिषेक शिंदे व पुनीत पवार या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळी करून हे यश संपादित केले.या सर्व विध्यार्थी खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल सर्व खेळाडुंचे संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे, सर्व विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!