
मेढा. दि .१९ . अत्यंत भक्ती भावाने अंतर्मनातील तन्मयतेने गायलेले ” महादेवा” गाणे शिवभक्त आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ठरेल असा विश्वास जावली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अभिजित शिंगटे यांनी व्यक्त केला.
बेलमाची गावचे सुपुत्र आणि गायन, लेखन, संगीत दिग्दर्शन या क्षेत्रात गरुड भरारी घेणारे गीतकार,लेखक, गायक आणि दिग्दर्शक, तुषार शिवाजी बोडरे यांनी गायलेले महादेवा गीत लवकरच रसिकांच्या भेटीला दिनांक 19/06/2023 रोजी प्रसिद्ध होत असून तुषार बोडरे, दयानंद इथापे, अविनाश जाधव यांनी लिहीलेल्या व तुषार बोडरे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या व गायलेल्या या गीतात हरहुन्नरी कलाकार अमोल अर्जुगडे आणि बाल कलाकार समर्थ विशाल शिरतोडे व धैर्यशील बोडरे यांनी आपली भूमिकेची एक वेगळी ओळख निर्माण केली असून या गाण्याचे चित्रीकरण ऋषिकेश देशमुख यांनी केले आहे या गिताचे एडिटिंग, डी आय संतोष शिंदे यांनी केले आहे मेकअप तेजश्री बाबर यांनी केला आहे.
संपुर्ण गीत तुषार शिवाजी बोडरे यांनी दिग्दर्शित केले आहे त्यांची दखल रसिकांनी घेतली आहे.या गीतास बेलमाची, किकली, लिंबगोवे ग्रामस्थ आणि शाही हॉटेल चे तेजस भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. लवकरच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू पाहणारे गीतकार, लेखक, तुषार बोडरे यांचे महादेवा गाणे संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाले असून रसिकांना ,शिव भक्तांना हे गीत खुप आवडेल असा विश्वास तुषार बोडरे यांनी व्यक्त केला आहे .