क्राईममहाराष्ट्रसातारा

मेढा पोलिसांनी खुनाच्याआरोपीस केली ०४ तासामध्ये अटक

स्टार११महाराष्ट्र न्युज — प्रतिनिधी

मेढा. दि.१८. सर्जापूर (ता. जावळी) गावच्या हद्दीत शेतात गुरुवारी रात्री जेवणाच्या पार्टीत झालेल्या वादावादीत रुईघर (ता. जावळी) येथील किशोर श्याम निकम (वय २९) याचा मारहाणीत खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेत वादावादीतून दांडक्याने मारहाण केल्याने किशोर निकम याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला असून सर्जापुर येथील वैभव रवींद्र बोराटे (वय २५) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली  कारवाईअनोखळी मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून झाला असल्याचे निष्पन्न करून आरोपीस ०४ तासामध्ये अटक —-
मौजे सर्जापुर ता. जावली गांवचे हद्दित मसनमोडा नांवचे शिवरातील शेतामध्ये दिनांक- १४/०६/२०२३ रोजी एका अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळून आले त्या बाबत गावकामगार पोलीस पाटील यांनी पोलीस ठाणेत दिलेल्या खबरीवरुन प्रथमदर्शनी अकस्मात मयत दाखल करणेत आली होती. तपासादरम्याण सदर मयतेची ओळख पटविणेकरीता गावकामगार पोलीस पाटील यांचे वॉट्सअॅप ग्रुप वर सदर मयत इसमाचा फोटो प्रसारित करणेत आला. त्याद्वारे सदर मयत इसमाचे नांव किशोर शाम निकम वय- २९ वर्षे रा. रुईघर ता. जावली असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर मयत इसमाचे मृत्युबाबत मयताचे नातेवाईकांनी मयताचा मारहाण करून खून केला असल्याचा संशय व्यक्त केल्याने व त्याबाबत आम्ही स्वतः पोलीस स्टाफ करवी गोपनिय बातमिदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळवून सदर मयत व आरोपी नामे वैभव रविंद्र बोराटे वय २८ वर्षे रा. सर्जापुर ता. जावली हे दोघे दारू पित असताना त्यांचेमध्ये वाद निर्माण झालेला होता व त्यामध्ये आरोपीने मयतास मारहाण केलेने त्यामध्ये त्याचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने भा.दं.वि.सं. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन सातारा जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर पोलीस अधीक्षक बापू  बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, बाळासाहेब भालचंद, मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष  तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेकडील अंमलदार यांचे खास पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेश दिले त्याप्रमाणे तपास पथकाने यातील संशयीत आरोपी याचा शोध घेवून त्यास केवळ ०४ तासामध्ये अटक करणेत आलेली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर पोलीस अधीक्षक बापू  बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, बाळासाहेब भालचंद, मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष  तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्विनी पाटील मॅडम हया गुन्ह्याचा तपास करीत असून सदर गुन्ह्याचे तपासामध्ये मेढा पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार स.पो.फौ. गंगावणे, पो. हवा. डी.जी. शिंदे, पो.ना. नंदु कचरे, पोशि/ सनी काळे, दिगंबर माने, अभिजीत वाघमळे, चालक विजय माळी, बाळकृष्ण नष्टे यांनी सहभाग घेतला आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!