
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —-
बामणोली.दि.२०.महिमंडणगड हा सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोऱ्यातला एक सातवाहनकालीन किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये असला तरी कोयना धरणाच्या पाण्याच्या विस्तार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यटकांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावातून महिमंडणगड पाहण्यासाठी जावे लागते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम दुर्गम कांदाटी खोऱ्यात स्थित व सातारा-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटावर नजर ठेऊन असणारा महिमंडणगड पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. महिमंडणगड सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात स्थित आहे.
सदर किल्ल्यावर दगडात खोदलेली अंदाजे १४ पाण्याचे टाके असून पाण्याची ठिकाणे काळाच्या ओघात गाळाने बुजून गेले आहेत. किल्ल्याच्या परिसरात पाण्यासाठी वन्यप्राण्यांचा नित्य वावर असतो त्यामुळे त्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे हेतुने किल्ल्यावरील टाकी स्वच्छता व इतर संवर्धनाचे कार्य सुरू करण्यात आले असून किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेची मजबुती करण्यात येणार आहे.
सदर उपक्रम उत्तम सावंत,उपसंचालक,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड, सुरेश साळुंखे, सहाय्यक वनसंरक्षक कोयना यांचे मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण हसबनीस वनक्षेत्रपाल, सुरेश सुर्यवंशी वनरक्षक, स्वप्नील शेंडगे वनरक्षक व स्थानिक वन मजूर यांनी राबवला या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक गडप्रेमी स्थानिक करत आहेत.



