महाराष्ट्रराजकीयसातारा

सातारा जिल्हा ताब्यात घेण्यासाठी मंत्र्यांचे दौरे वाढले….आ.शशिकांतजी शिंदे

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला .. अबाधीत राखू…आ.शशिकांतजी शिंदे

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–



मेढा. दि.२८.सातारा जिल्हा व जावली तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काल होता , आज ही आहे आणि उदयाही राहील . कारण सत्ता नसतानाही जनता मोठया संख्येने राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे.पदाधिकारी पक्ष सोडून गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत . जिल्हा काबीज करण्यासाठी मंत्र्यांचे जिल्ह्यात दौरे वाढले असून त्याचा काहीही उपयोग होणार नाही . कारण यशवंतराव चव्हाण यांचे विचाराचा व शरद पवार साहेबांना माननारा हा जिल्हा आहे. असे प्रतिपादन आ . शशिकांतजी शिंदे यांनी केले .


सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये जावली तालुका राष्ट्रवादी युवक च्या विविध पदाच्या नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रम आ. शशिकांतजी शिंदे यांचे शुभहस्ते , अमितदादा कदम यांच्या उपस्थीतीमध्ये संपन्न झाला या प्रसंगी आ. शिंदे बोलत होते. यावेळी सुरेश पार्टे, चंद्रकांत गवळी, साधू चिकणे, अशोक गोळे , प्रमोद जाधव,युवकचे अध्यक्ष आतिष कदम यांच्यासह जावली तालुक्यातील विविध विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

फोटो
युवक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देताना आ. शशिकांतजी शिंदे, अमितदादा कदम, व मान्यवर


आ. शिंदे पूढे बोलताना म्हणाले , सत्तेचा दुरपयोग करून सध्याचे सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे . पण त्याचा उद्रेक येणाऱ्या निवउणूकांमध्ये पाहायला मिळेल. सध्या देशात व राज्यात हुकुमशाही सरकार असून एका हाताना योजना द्यायच्या व दुसऱ्या हाताने लुट करायची हे चालू आहे. काही जण म्हणत आहेत की पवारसाहेबांनी जिल्हया साठी काय केलं ? हे ते बोलत नसून त्यांच अज्ञान बोलत आहे. माणसाच्या हृदयात ज्यांच स्थान आहे ते कोणीच बदलू शकत नाही. खरतर ज्यांच्यामुळे आपण उभे राहीलो त्याची जाणीव ठेवली पाहीजे. संख्येला महत्व नसून १०चे १० हजार व्हायला वेळ लागत नाही . पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्ष संघटने साठी अंग झोकून काम केले पाहिजे.त्यासाठी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. असे सुचित करुन आ. शिंदे पूढे म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व महात्मा गांधी यांच्या असहितेतून येणाऱ्या काळात मोठा उठाव होवून हुकुमशाही व दडपशाही धोरण राबविणाऱ्यांचा नक्कीच अंत होईल.आजचे प्रश्न आहेत ते तसेच आहेत. प्रश्न का सुटत नाहीत.? त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी तेवढयाच ताकदीने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहीजे. कार्यकत्याबरोबर गांवेच्या गांवे एक झाली पाहिजेत . जावली तालुका पुन्हा मोठया ताकदीने उभा करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सुचित केले.


यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमितदादा कदम म्हणाले, आज समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्याबाबत समाजाचे प्रबोधन करण्याची जबाबदारी आपली आहे .पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याबरोबर कार्यकत्यांचे काम केले पाहिजे. पद मिळाले म्हणजे झाले . असे नाही तर त्या पदाला न्याय देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहीजे . कोणी काहीही म्हणत असलेतरी येणाऱ्या निवडणूकीत सातारा जावली विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार असेल असे त्यांनी सुचित केले.


प्रारंभी राजश्री शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नवनियुक्त युवक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आ. शशिकांतजी शिंदे यांचे शुभहस्ते वितरीत करण्यात आली.प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक चे जावली तालुका अध्यक्ष आतिष कदम यांनी केले .सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार सुरेश पार्टे यांनी मानले.

राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे —— सुरेश गोळे : युवक उपाध्यक्ष ( हातेघर ),चेतन सुर्वे : युवक उपाध्यक्ष (घरातघर ), इम्रान आत्तार युवक शहर अध्यक्ष (मेढा ), अखिब पठाण युवक शहर उपाध्यक्ष (मेढा ),प्रथमेश भणगे कुसुंबी गट अध्यक्ष (केडंबे ), रविराज चिकणे युवक सरचिटणीस ( गांजे ), उदय पार्टे युवक सरचिटणीस (केसकरवादी ),अमोल शिंदे युवक सरचिटणीस (हुंमगाव )समीर झोरे युवक सचिव (सह्याद्रीनगर ), शिवाजी गोळे युवक सचिव (महू )

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!