
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-
मेढा.दि.२६. आमदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले आणि माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे कट्टर समर्थक श्री विठ्ठल देशपांडे यांची भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपदी श्री धैर्यशील दादा कदम यांनी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी सांभाळून पक्षाच्या बांधणीमध्ये सामाजिक तथा राजकीय इतिहास क्षेत्रात उल्लेखनीय काम करून पक्ष संघटन मंजबूत व्हावे व जास्तीत जास्त लोकांची पक्षाशी जोडणी व पक्ष संघटनेच्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन संघटनेची वाटचाल गतिमान करण्यास प्रयत्न करणार असल्याचे श्री विठ्ठल देशपांडे यांनी सांगितले.
विठ्ठल देशपांडे हे शालेय जीवनापासून भारतीय जनता पार्टीचे काम करतात या अगोदर त्यांनी जिल्हा चिटणीस तालुका उपाध्यक्ष तालुका सरचिटणीस पदी काम केले आहे.या निवडी बद्दल मा.ना.श्री चंद्रकांतदादा पाटील, आ.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री मुरलीधर आण्णा मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रमजी पावसकर,ना.श्री नरेंद्रजी पाटील साहेब,श्री अतुलबाबा भोसले आदी मान्यवरांसह समस्त जवलीकरांनी देशपांडे यांना शुभेच्छा दिल्या.