संघर्षातून गेलेल्या लोकांनी स्वतःचे सामर्थ्य घडवून उच्च पदस्थ अधिकारी झाले…..

सातारा. दि.१६.शासकीय निमशासकीय विभागांतील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व पदाधिकारी यांनी आपल्या जीवनातील परस्थितीच्या आथिर्क व सामजिक परस्थितीतून केलेल्या संघर्षातून उच्च पदस्थ होण्याचा बहुमान मिळवला असून संघर्ष हेच सामर्थ्य या उपशिक्षणाधिकारी ( माध्य ) रविंद्र खंदारे यांनी लिहिलेल्या आत्मचरीत्माक पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी राज्याचे शिक्षण योजनेचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी आपले मत व्यक्त केले. 
याप्रसंगी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, निवृत्त उपसंचालक हनुमंत जाधव., शिक्षणाधिकारी शबनम मुजावर. उप शिक्षणअधिकारी धनंजय चोपडे., सुचेता क्षीरसागर., सचिन नलवडे., कर सल्लागार कैलास काशीद., प्रकाशक घनश्याम पाटील व जिल्हयातील सर्व गट शिक्षणधिकारी व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या सभाृहात संपन्न झाला.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व कर्मवीर भाऊराव पाटील व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी बोलताना पालकर पुढे म्हणाले की. खंदारे यांनी लिहलेल्या पुस्तकात जसं घडल तस लिहल्याने सत्य परस्थिती किती संघर्षमय असते या पुस्तकाचं वाचन संघर्षातील विद्यार्थ्या पेक्षा सोन्याचा चमच्या तोंडात घेवून जन्म लेल्या सधन विथार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा ही संघर्षमय कथेचे वाचन केल्यास आपला पाल्य समृध्द होईल असे मत व्यक्त केलं.
यावेळी मार्गदर्शन करताना उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले की विध्यार्थी दशेतील गरिबीचे चटके सहन केलेल्या संघर्षातून उच्च पातळीवरील विचार करुण संघर्ष कहाणी कथन किंव्हा वाचली तर त्यांच्या उचत्तम विचारातून नवा विद्यार्थ्याला त्याचा उपयोग होईल. यावेळी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर. हनुमंत जाधव. धनंजय चोपडे. प्रकाशक घनश्याम पाटील. व लेखक रविंद्र खंदारे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल माने यांनी केले तर स्वागत घनश्याम पाटील यांनी केले. आभार माधवी खंदारे यांनी मानले. जिल्ह्यातील शिक्षव्यवस्थेतील सर्व प्रतिनिधी आप्तपरिवार व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.



