
स्टार११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
मेढा. दि.२४.जावली तालुक्यातील रिटकवली गावची कन्या श्रावणी सुधाकर दुंदळे ही इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागामधून दहावी आली आहे.जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आसनी येथे शिक्षण घेतलेल्या श्रावणी सुधाकर दुंदळे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत असे यश मिळवून आपल्या आईवडिलांचे,दुंदळे कुटुंबियांचे,आसनी आणि रिटकवली गावाचे नाव उज्ज्वल केले.
श्रावणी हिस वर्गशिक्षक संजीवन निकम,मुख्याध्यापक संपत शेलार,शाशिकांत शेलार व सुषमा खटावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रावणी ने मिळविलेल्या यशाबद्दल माजी सहाय्यक आयुक्त रमेश चव्हाण साहेब,गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल,चंद्रकांत कर्णे केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप,शाळा व्यवस्थापन समिती,आसनी आणि ग्रामस्थ मंडळ रिटकवली यांनी अभिनंदन केले.