
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-
मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे.
नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा विविध माध्यमांत जयंत सावरकरांनी स्वतःच्या चतुरस्र अभिनयाचा अनोखा ठसा उमटवला आहे. ते स्वतः जसे एक उत्तम चतुरस्र अभिनेता होते तसेच ते अनेक कलाकारांचे अभिनय क्षेत्रातील मार्गदर्शक होते.
जयंत सावरकर यांनी अनेक माध्यमातून विविध भूमिका केल्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांनी नवीन कलाकारांना नेहमीच करून दिला. एक विचारवंत कलाकार म्हणून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांनी सहकलाकार आणि कर्मचाऱ्यांसोबत व्यक्तिगत मैत्री सदैव सांभाळली.
