स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——(अजित जगताप)
सातारा दि०३ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा नारा देत सर्वसामान्य माणसांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची उतराई म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक साहित्य तयार झाले. परंतु, साताऱ्यातील रिपब्लिकन चळवळीचे खंदे समर्थक आदित्य गायकवाड यांनी आपल्या कंठावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इंग्लिश भाषेतील सही गोंदून खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रताप हायस्कूल या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली त्या सातारा भूमित आदित्य गायकवाड यांनी चार महिन्यापूर्वीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक गीते ,कविता व जलसा कार्यक्रम पाहिला. आपण या महामानवाचे गीत सुमधुर आवाजाने म्हणू शकत नाही. परंतु, आपल्या कंठावर त्यांची निशाण असावी. याच भावनेने त्यांनी आपल्या कंठावरच बी. आर. आंबेडकर अशी इंग्रजी भाषेतील सही कोरून घेतलेली आहे.
आदित्य गायकवाड यांनी आपल्या कंठावर बी आर आंबेडकर अशी गोंदण केलेली सही त्यांचा रुबाब वाढवत आहे.
विशेष म्हणजे साताऱ्यातीलच कारागिराने तब्बल चार तास मेहनत घेऊन बी. आर. आंबेडकर ही सही हुबेहूब कोरलेली आहे. याबाबत आदित्य गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,बुधवार नाका सातारा येथील रहिवासी असलो तरी माझे वडील सतीश गायकवाड हे पॅंथर पासून कार्यरत होते. आता मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली व चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. माझं मूळ गाव हे पाचवड ता. वाई जिल्हा सातारा असून सध्या सातारा शहरातील अनेक घडामोडी मध्ये मी सक्रिय सहभाग घेत आहे .ज्या वेळेला दलित, कष्टकरी, शेतमजूर व दलितांवर अन्याय होत असेल. त्यावेळेला कुठलीही तमा न बाळगता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सध्या सातारा नव्हे तर जिल्ह्यात एक प्रमुख शस्त्र बनलेले आहे .टोल नाका आंदोलन असो तहसीलदारांच्या मनमानी कारभाराविरोधात असहकार भूमिका असो. अनेक आंदोलन केलेले आहेत .
भविष्यात आक्रमकरीत्या आंदोलन करून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आमच्या घटनाकारांच्या आठवणीने आमच्या कंठ दाटून येत आहे. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. असे गीताचे बोल होते. त्याचाच आदर्श घेऊन त्यांनी आपल्या कंठावर बी. आर. आंबेडकर ही सही कोरलेली आहे. आज आदित्य गायकवाड हे युवकांचे रोल मॉडेल ठरलेले आहेत.