स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- जमदाडे ( सर )
कुडाळ.दि.११.आजच्या तंत्रज्ञान युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज असून शिक्षणालाही तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे.या भूमिकेतून दातृत्व भावनेतून वैभव जगताप यांच्याकडून जावलीतील चार शाळांना संगणक मिळाले आहेत.त्यांनी केलेली मदत निश्चितच उल्लेखनीय आहे.या संगणक प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले याचा आनंद होत आहे.समाजात आशा दातृवान व्यक्ती आहेत आपणाला त्यांच्यापर्यंत पोहचता आले पाहिजे. यादृष्टीने जावलीतील शिक्षकांचे काम उल्लेखनीय असून येथील वेगळी शैक्षणिक परंपरा जपली जात आहे. आज सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्याबरोबरच भविष्याचा विचार करता जागतिक स्वीकार्यता असणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी केले.
सर्जापूर ता.जावली याठिकणी वैभव जगताप यांच्यामार्फत नितीन मोहिते यांच्या प्रयत्नाने जावलीतील चार शाळांना संगणक संच प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रप्रमुख अरविंद दळवी,धिरेश गोळे,विलास मोहिते,सुरेश चिकणे,विजय शिर्के,सुरेश पार्टे,राजेंद्र मोहिते,विकास मोहिते,नितीन जाधव,सुरेश पवार,सागर धनावडे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थित सर्जापूर म्हसवे, आलेवाडी,हातगेघर या शाळांना वैभव जगताप यांच्याकडून मिळालेला संगणक संच प्रदान करण्यात आला.
विकास मोहिते म्हणाले,प्राथमिक शिक्षण हा जीवणाचा पाया आहे.सर्जापूर गाव हे शिक्षणाची पंढरी आहे.याठिकणी शिक्षण क्षेत्राचा विचार अनेक पिढ्यानपिढ्या जपला आहे.येथील विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकत आहेत.आजच्या गतिमान विद्यार्थ्यांना युगात संगणक उपयुक्त असून वैभव जगताप यांच्या दातृत्वातून आज शाळांना मिळाला आहे.याचा निश्चितच विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
यावेळी नितीन जाधव,विजय शिर्के,नितीन मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.उषा शिवणकर यांनी प्रास्ताविक केले.दत्तात्रय शिंगटे यांनी आभार मानले.
सर्जापूर शाळेला संगणक संच प्रदान करताना गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,अरविंद दळवी व इतर मान्यवर.




