सातारासामाजिक

रेशनिंग कार्ड ई-केवायसी पूर्णपणे निशुल्क (मोफत) तहसिलदार हनमंत कोळेकर

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा.दि.२४. रेशनिंग कार्डधारक यांचेकडून इ केवायसी करिता मेढा येथिल रेशनिंग दुकानदार प्रत्येकी १००/- रु.ची मागणी करत असल्याची तक्रार मेढा येथील नागरिकांनी तहसीलदार हनमंत कोळेकर यांच्याकडे केली.तातडीने नागरिकांसमोर प्रकरणाची चौकशी करत जावळी तालुक्यात अश्या कोणताही सूचना दिलेल्या नसून बोगस शिधापत्रीकेला आळा बसावा म्हणून शिधा पत्रिकेवर नावे असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करण्यात येत आहे.सदर इ केवायसी ही पूर्णपणे निशुल्क (मोफत) आहे.तसेच सर्वांनी ई-केवायसी करुन घेणे महत्वाचे आहे.जर दुकानदार पैशाची मागणी करत असेल तर पैसे देऊ नयेत.असेही यावेळी तहसिलदार कोळेकर यांनी नागरिकांना सांगितले.

यावेळी माजी उपसरपंच प्रकाश कदम जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट),सुरेश दळवी चेअरमन मेढा वि.का.स. सेवा सोसायटी,अरुण जवळ सामाजिक कार्यकर्ते, डॉ.आनंदराव दळवी सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत दळवी.व पत्रकार.दत्तात्रय पवार , शेखर जाधव,जितीन वेंदे,उपस्थित होते.

तसेच रेशनिंगला येणारा तांदूळ प्लास्टिकचा नसून पोषकतत्व असलेला फोर्टिफाईड तांदूळ आहे.मात्र शासनाकडून या बाबत जनजागृती झाली नसल्याने लाभार्थ्यांमध्ये चलबिचल होत असून लाभार्थी संभ्रमात आहेत.सामान्य तांदळापेक्षा फोर्टिफाईड तांदूळ हे अधिक पोषक ठरतात असं सांगितलं जातं. पण अनेकांना फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे नेमके काय माहीत नाही. फोर्टिफाईड तांदूळ अशा प्रकारचे तांदूळअसतात जे अतिरिक्त पोषक तत्वांनी समृद्ध करण्यात येतात,जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी मदत मिळेल.तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी नागरिकांमध्ये फोर्टिफाईड तांदळाच्या विषयी असलेला गैसमज दूर केला.

प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे. यातून बनावट शिधापत्रिका धारक शोधण्यात येत आहेत.बरेच ग्राहक चुकीच्या पद्धतीने रेशन घेतात त्यांनाही यामुळे आळा बसेल.धान्यवितरणात पारदर्शकता यावी यासाठी ई- केवायसी करणे आवश्यक आहे.

तहसिलदार हणमंत कोळेकर

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!