
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
केळघर.दि.२५. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची बातमी समोर आली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकाराच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारे सातारा-जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाचे खाते मिळणार असल्याची खात्री कार्यकर्त्यांना आहे. मंत्रिपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव आघाडीवर असल्याने जावली तालुक्यातील विश्वासू कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले आहे.
अश्यावेळी जावली तालुक्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे विश्वासू सहकारी केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री सुनिल (नाना) जांभळे, दिपक शेलार हॉटेल समृद्धीचे मालक सचिन पार्टे, युवा उद्योजक सतिश पार्टे, युवा उद्योजक अक्षय चिकणे, युवा उद्योजक अनिल बेलोशे इ.युवक उत्तराखंड येथील केदारनाथ येथे साकडे घालण्यासाठी थेट पोहचले. केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले असता मंदिराजवळ पोहचताच हर हर महादेवच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला. व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे यासाठी केदारनाथाकडे कार्यकर्त्यांनी आज साकडे घातले.