मेढा येथे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्काराचे आयोजन

वसंत गडावर मेढा येथे उद्या धडाडणार जावलीची मुलुख मैदानी तोफ
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि.२७.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ३० मार्च रोजी वाढदिवस संपन्न होत आहे. या निमित्ताने जावळी तालुक्यातील जनतेच्या वतीने मेढ्यातील मानकूमरे पॉईंट येथे शुक्रवार (२९मार्च)रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज बुधवार मानकुमरे पॉईंट येथे तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ३० मार्च रोजी मेढा येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जाणार आहे. जावळी तालुक्यातील जनतेच्या वतीने 29 मार्च रोजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळी तालुक्याचे नेते वसंतराव मानकुंमरे,माजी उपसभापती सौरभ शिंदे, जावली- महाबळेश्वर बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे, युवा नेते सागर धनावडे, मेढा नगरपंचायत माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, विलासबाबा जवळ,कांतीभाई देशमुख, माजी उपसभापती हनुमंतराव पार्टे, समीर आतार नाना जांभळे, यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जावली तालुक्यातील जनतेच्या वतीने दि. २९ मार्च रोजी मानकुमरे पॉईंट मेढा येथे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रम स्थळी सायंकाळी ५ वा.आ. शिवेंद्रसिंहराजे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
दरम्यान या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले.