अंगातल वारं निघालं की टिका करणारे गायब होतील….. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

स्टार ११ महाराष्ट्र
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मेढ्यात सभा….
मेढा.दि २८. निवडणुकीपुरत मुंबईतून येवून हे झाले पाहिजे, ते केले पाहिजे असं बोलायच, टिका करायची असं वारं काही जनांच्या अंगात निवडणुकीत येत, त्यांच हे वारं उतरल की ही मंडळी गायब होतील असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.
सभेला जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, भाजपा जावली तालुका अध्यक्ष मारूती चिकणे, संदीप परामणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपनगराध्यक्ष दत्ता आण्णा पवार, माजी सभापती अरूणा शिर्के, आरपीआयचे एकनाथ रोकडे, कांतीभाई देशमुख, प्रमोद पार्टे, शशिकांत गुरव, शिवाजीराव मर्ढेकर आदींसह सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या भाषणात पुढे म्हणाले, मेढा बाजारपेठेतील दर एवढे जास्त आहेत की, आता जागा घेणे शक्य आहे का ? का वाढले दर तर मेढ्यातील भौतिक सुविधा वाढल्या आहेत. पंधरा कोटीची पाण्याची योजना करतोय. मेढा वासियांना शंभर टक्के शुद्ध स्वच्छ पाणी मिळेल. स्मशानभूमीसाठी संपादीत जागा होती त्यामुळे पैसे टाकता येत नव्हते. पण शासनाने सदर संपादीत जागा नगरपंचायत ला द्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. मेढ्यात मच्छी मार्केट झाले पाहिजे. मेढ्यात दहा पंधरा वर्षे टिकणारे काॅक्रींटचे रस्ते करणार. मेढा हे चांगले स्वच्छ सुंदर शहर करायच आहे. काही लोक मेढ्याची तुलना इतर शहरांशी करून भूलथापा मारतात पण अशी तुलना योग्य नाही. दोन तारखेनंतर अशी लोक चार दोन दिवस थांबतील आणि स्टार्टर मारून निघून जातील. आम्ही मस्तवाल हत्ती नसून सर्वसामान्य लोकांमध्ये लोकांबरोबर राहतो. आमचा काम करण्यावर भर असतो. काम हातात घेतल की पूर्ण करतो. त्यामुळे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही असा टोला त्यांनी शिवसेनेच्या अंकुश कदम यांना नाव न घेता लावला.
घरपट्टी या मेढ्यातील ज्वलंत प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, विरोधक आम्ही स्थगिती आणली हा कागद नाचवतात आधी पत्र नीट वाचा मी घेतलेली स्थगितीच कायम पुढे ठेवल्याचे त्यात स्पष्ट होते. एवढच करायची हौस होती तर पुढील पंधरा वर्षांसाठी घरपट्टी माफ अस पत्र का आणल नाही असा सवाल करत घरपट्टी वाढ चुकीची आहे ती मान्य आहे पण ज्या प्रमाणात वाढ व्हावी यासाठी नवीन सदस्य आल्यावर निर्णय घेवू. आमचा १७/० असा विजय होणार असल्याने विरोधी पक्षनेता कोठून आणायचा असा प्रश्न आम्हाला पडत आहे.
एम आय डी सी साठी जागा कोण देणार.इथला शेतकरी जागा घेऊन उद्ध्वस्त करता का ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यात ही एम आय डी सी नाही मग अगोदर तिथं करून मग जावळीत ही आणा असे आवाहन त्यांनी शिवसेनेला दिले.
जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे बोलताना म्हणाले, आमच्याशी गद्दारी केलेल्या व गेल्या वेळी आम्ही बिनविरोध नगराध्यक्ष केलेल्या हौशा मुकणेला गाडायच आहे. त्याच्या खेकड्याच ही वाटोळे करायचं आहे. अंकुश कदम यांना आव्हान देत नया है वह या भूमिकेचा पुनरुच्चार करत ये मैदानात, आम्ही अनेकांना घरी घालवल, आम्ही मस्तवाल हत्ती आहोत असं बोलतो काय ! तुझ्यासारखे किती अंकुश पायाखाली घेवू हे कळायच पण नाही असे सांगून आमच्या नेत्यावर टिका केली तर वळवळणारी जीभ बाहेर काढू असे आव्हानच दिले.
खासदार उदयनराजे हे लगेच इफेक्ट देणारे ॲंटीबायोटिक्स आहेत तर शिवेंद्रसिंहराजे हे डायबिटीस सारख आहे थोड थोड खंगून खंगून मारणार औषध आहे असे बोलत पाठीत खंजीर खुपसलेल्याना सुट्टी नाही असा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.
यावेळी पांडुरंग जवळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक शशिकांत गुरव यांनी केले तर आभार माजी उपनगराध्यक्ष दत्ताआण्णा पवार यांनी मानले.



