सातारासामाजिक

पैलवान विराज भोसले शिवप्रेमी केसरी चा मानकरी
तर मानाची गदा मानकरी ठरला पिंपरीचा पै यश वांगडे

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-


कुसुंबी. दि.३०.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवप्रेमी मित्र समूह पिंपरी तसेच नवजवान तरुण मंडळ पिंपरी आयोजित निकाली कुस्त्यांचा जंगी मैदानाची आयोजन केले होते या कुस्ती आखाड्यात सुमारे ३५ ढाली तर मानाच्या गदा याचा समावेश होता.

तसेच शिवप्रेमी केसरी ची १११११ ची कुस्ती कै. चंद्रकांत विष्णू वांगडे तसेच कै.दिलीप विष्णू वांगडे यांच्या स्मरणार्थ संदीप चंद्रकांत वांगडे पी.एस.आय. यांचे तर्फे ही कुस्ती लावण्यात आली होती होती. या लढतीमध्ये करंडी  मालचोंडी तालीम संघाचा पैलवान विराज भोसले या पैलवानाने पैलवान विठ्ठल सलगर याला चितपट करत१११११ चे बक्षीस पटकावत शिवप्रेमी केसरी चा मानकरी होण्याचा बहुमान पटकावला तर पिंपरी गावचा पैलवान यश नंदकुमार वांगडे याने पै. यश निमज याला चित पट करून मानाच्या गदेवर आपला शिक्का मोर्तब केला.

कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले पिंपरी गाव गेली दोन वर्षे शिवजयंतीच्या निमित्ताने निकाली कुस्त्यांचा जंगी फडाचे आयोजन शिवप्रेमी मित्र समूह, नवजवान तरुण मंडळ पिंपरी यांच्या सहकार्याने करत आहे. कुस्त्यांचा जंगी फड यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ तालीम संघ मेढा तसेच जय हनुमान तालीम संघ पिंपरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कुस्ती आखाड्यात जावली तालुक्यातील कुस्ती शौकीन असलेले अनेकांनी वस्ताद चे काम पाहिले यामध्ये दक्षिण विभागातील सर्व मान्यवर मेढा विभागातील सर्व मान्यवर सातारा तालीम संघ भैरवनाथ तालीम संघ या सर्वच मान्यवरांचे शिवप्रेमी मित्र समूह तसेच नवजवान तरुण मंडळ पिंपरी ग्रामस्थ मंडळ पिंपरी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!