महाबळेश्वर भाजपा महिला उपजिल्हा अध्यक्षा मा उषाताई ओंबळे यांच्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोफत तिरंगा झेंडाचे वाटप

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान हर घर तिरंगा अभियान
सातारा. दि.१३. महाबळेश्वर मध्ये भारतीय जनता पार्टी महाबळेश्वर शहराच्या वतीने भाजपा महिला उपजिल्हा अध्यक्षा मा उषाताई ओंबळे यांच्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोफत तिरंगा झेंडाचे वाटप करण्यात आले.
शहरातील मरी पेठ,माळी आळी,कोळी आळी तसेच गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्रं 1 व एम ई एस इंग्लिश हायस्कूल मध्ये शाळेतील पालकांना व शिक्षकांना मोफत तिरंगा झेंडा वाटप करण्यात आले.13 ते 15 ऑगस्ट शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आव्हान उषाताई ओंबळे यांनी केले आहे.
या वेळी शाळेतील विद्यार्थ्यानी ‘भारत माता की जय”वंदे मातरम ‘ घोषणांनी शाळेतील परिसर दुमदुमून गेला भाजपा महिला उपजिल्हा अध्यक्षा मा उषाताई ओंबळे ,शहराध्यक्ष श्री राजेंद्र पवार भाजपा सदस्य श्री अर्जुन घावरी ,सौ लक्ष्मी वाडकर, शाळेतील मुख्याध्यापक श्री ओंबळे सर ,श्री गोळे सर ,एम ई एसच्या प्रिंसिपल शिला रशिया मँडम व शिक्षक ,पालक उपस्थित होते.