सर्वधर्मीय भाव कलेच्या माध्यमातून निर्माण करणारे कलाकार सर्वश्रेष्ठ ठरतात शनि शनैश्वर महाराज

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
सातारा दि.१९. सामाजिक सार्वभौम्य प्रस्तावित करून सर्वधर्मसमभाव असणारे कलाकार हे समाजाच्या चित्रांचे रेखाटन करून त्यांच्या मनातील विचारांना आपल्या कुंचल्यातून समाजाची परिस्थिती दाखवितो तो कलाकार सर्वश्रेष्ठ ठरत असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र सोळशी शनि शनैश्वर देवस्थानचे वतीने आयोजित जिल्ह्यातील चित्रकारांच्या सन्मान प्रसंगी पुढे महाराज म्हणाले जिल्ह्यातील देशात व जागतिक पातळीवर अनेक कलाकार निर्माण झाले.

जगाच्या नकाशात जिल्ह्याचे सर्वच क्षेत्रातील कलाकारांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कर्तुत्ववान होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्याला अभिमान वाटावा अशाच पद्धतीने जिल्ह्यातील कलावंत काम करीत असल्याचे सांगून सर्वश्री चित्रकार बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन जगताप, जयसिंग पवार, पंकज कणसे, दिगंबर चौगुले, अनंत लोहार, पुष्कराज ऊर्फ राजू वायदंडे ,सोमनाथ आवळे ,संजय सकट, अमर काशिद, महेश जाधव, रविंद्र खंडझाडे,दिलीप गुळांबकर,बाळकृष्ण निंबाळकर, मोहन घोलप, शशिकांत शिराळे सुमेध आर्ट्स व केशव जगताप व निवांत कांबळे या चित्रकारांचा शाल श्रीफळ व मानपत्र देवून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज जगताप यांनी केले

या कार्यक्रमास जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील भाविक उपस्थित होते



