मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या युवकांना सातारा शहर पोलिसांनी केली अटक
सातारा शहर पोलिसांची शहर परिसरात कारवाई

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा दि.२०.( प्रतिनिधी ) मोटारसायकलवरून येवून मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या चार युवकांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
एक मोटारसायकल व पाच मोबाईल असा १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोल्हापूर-पुणे हायवेवर चारचाकी वाहन पंक्चर झाल्याने सदर गाडीतील वाहन चालक हे सुझुकी शोरूम ते बॉम्बे रेस्टॉरंट असे पंक्चर दुकान शोधत असताना फोनवर बोलत जात होते. एका मोटार सायकलवरील चार अनोळखी युवकांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेवून ते पळून गेले होते. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागिय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी चोरटयांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्याने पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरटयांची गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतला.सातारा शहर परिसरातून पळून गेले होते.शुक्रवारी सातारा शहर परिसरात आल्याची माहिती मिळाल्याने सदर युवकांना शहर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.या गुन्हयात वापरेलेली मोटारसायकल व एकूण ५ मोबाईल असा १ लाख ३० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोह निलेश यादव, सुजित भोसले, पोना संतोष शेलार, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, विशाल धुमाळ, संतोष कचरे, गणेश घाडगे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी केली.



