स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
मेढा दि.२०. जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प सातारा अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालय जावली येथे संपन्न झाली. विकास बंडगर, प्रमुख, जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांचे अध्यक्षते खाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत केंद्र शासनामार्फत कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेतून काढणीपश्चात व्यवस्थापन सुविधा आणि सामुहिक शेती सुविधा निर्माण करणेसाठी प्रोत्साहन देवून एकुणच कृषि पायाभुत सुविधा सुधारणे आणि यासाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक गुंतवणूकीची व्यवस्था निर्माण करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.कृषि सहकार व शेतकरी कल्याण विभागामार्फत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत 2.00 कोटी रुपयांच्या मर्यादेत योजनेतील कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सुट असेल.
या कार्यशाळेस संजय घोरपडे तालुका कृषि अधिकारी जावली, बी. एस. बुधावले तालुका कृषि अधिकारी महाबळेश्वर, शशिकांत घाडगे, पुरवठा साखळी व मुल्यसाखळी तज्ञ स्मार्ट सातारा, नितीराज साबळे, जिल्हा अग्रणी बैंक प्रतीनिधी सातारा, आण्णासाहेब फरांदे, विभागीय अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राजेंद्र गोर्डे, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागर स्मार्ट सातारा, अजय पोळ, संगणक चालक स्मार्ट सातारा तसेच तालुक्यातील सर्व बँक अधिकारी, प्रतिनिधी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, बीटीएम, व तालुक्यातिल कर्मचारी, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, बचत गटाचे प्रतिनिधी, कृषी उद्योजक सुशिक्षित बेरोजगार युवक, प्रगतीशील शेतकरी, कृषी पदवीधर, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे अधिकारी, नागरी सेवा केंद्रांचे चालक उपस्थित होते.
कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेचे सादरीकरण राजेंद्र गोर्डे यांनी केले. मेघनाथ कांबळे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, कृषि संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय पुणे, यांनी ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन संजय घोरपडे यांनी केले.
00000