
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
मेढा.दि.६. आपत्तीच्यावेळी व दुर्देवी घटनांमध्ये जवळच्या व्यक्तिंना तातडीने संदेश मिळाल्याने होणारे नुकसान टाळता येत असल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणेची गरज व महत्त्व अधिक आहे. असे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे यांनी मेढा येथे आयोजित शिबिरात सांगितले.
याबाबत श्नी.गोर्डे म्हणाले की आपत्तीच्यावेळी व दुर्देवी घटनांमध्ये जवळच्या व्यक्तिंना तातडीने संदेश मिळावा नागरिकांनी चोरी, दरोडा, अपघात यासारख्या व इतर संकटकाळात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या 18002703600 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास चोरी, दरोडा, अपघात यासारख्या घटना घडत असतानाच फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला तात्काळ मदत मिळून पुढील नुकसान टाळता येते. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन आपले नंबर नोंदवावे व या यंत्रणेचा वापर करावा. मेढा पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. जावली तालुक्यातील लोकांनीही यात सहभागी व्हावे. सातारा जिल्हा पोलिस व सातारा जिल्हा परिषदेच्या या संयुक्त उपक्रमाचे प्रात्यक्षिक मेढा येथील कलश मंगल कार्यालयात दाखविण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधील पोलिस पाटील,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव,आशा सेविका,अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी केले.

या शिबिरासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील,गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,गोपनीय अंमलदार अभिजीत वाघमळे,यांच्यासह मेढा पोलीस स्टेशनचे अंमलदार व महम्मद शेख तसेच सर्व बीट अंमलदार यांनी परिश्रम घेतले.पोलिस पाटील सुहास भोसले यांनी आलेल्या सर्वांचे मानले.

मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी ग्रामीण सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊन आपले मोबाईल नंबर नोंदवावे व या यंत्रणेचा वापर करावा.सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर



