दानवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.मनीषा दानवले तर उपसरपंचपदी सौ.सविता प्रदीप दानवले यांची बिनविरोध निवड

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —-
पांचगणी ,ता.१५ : दानवली (ता. महाबळेश्वर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ मनीषा अर्जुन दानवले तर उपसरपंचपदी सविता प्रदीप दानवले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
दानवली ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या. आज सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आली होती. यामध्ये सरपंचपदासाठी सौ. मनीषा अर्जुन दानवले यांचा एकच अर्ज व उपसरपंच पदासाठी सविता प्रदीप दानवले यांचा एक अर्ज दाखल झाल्याने या निवडी ही बिनविरोध पार पडल्या.
अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाचगणीचे मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे यांनी काम पाहिले निवडणूक निरीक्षक म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री.डोईफोडे साहेब तसेच प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी आप्पा जाधव यांची यावेळी उपस्थिती होती
या वेळी नवनिर्वाचित सदस्य मनीषा अर्जुन दानवले, सविता प्रदीप दानवले , मंदा बबन धनावडे , ज्योत्स्ना विकास दानवले, बाबुराव सिताराम दानवले, महादेव आनंदा दानवले विष्णू धोंडीराम दानवले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवं निर्वाचित सरपंच मनीषा अर्जुन दानवले यांनी निवडीनंतर सांगितले इतर सदस्यानी माझेवर टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडणार असून सर्व सहकारी सदस्य आणि ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावाच्या विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी पाठपूरावा करणार आहे.
नवं निर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.





