अपघात

रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघातात एकाचा मृत्यू

स्टार ११ महाराष्ट्र

सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील आजच्या दिवसातील दुसरा अपघात


मेढा.दि.२९. सातारा मेढा रस्त्यावर केसकरवाडी जवळ रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला असून दुसऱ्यावर सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर नगरपालिकेची रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन सातारा येथे निघाली होती केसकरवाडी जवळ रुग्णवाहिका आली असता सातारा बाजू कडून मेढ्याकडे जाणारे दुचाकी रस्त्याच्या उलट दिशेने आल्याने भरधाव रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली दुचाकी वरील अनिल विष्णू धनावडे मूळ राहणार तापोळा हल्ली राहणार बैल बाजार मेढा वय 27 हा जागीच ठार झाला.

दुचाकी वर पाठीमागे बसलेला अभिजीत संजय जाधव राहणार गांजे हा जखमी झाला आहे जखमीला उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!