
मुंबई, दि. 25 : ज्येष्ठ पत्रकार,लेखक,वक्ते आणि भाष्यकार शिरीष कणेकर यांचे आज निधन झाले आहे.
उत्तम पत्रकार असलेले शिरीष कणेकर मिश्किल, हरहुन्नरी व विनोदी लेखक तसेच प्रभावी वक्ते होते. कणेकर यांनी अखेरपर्यंत स्तंभलेखन केले आणि आपल्या खुमासदार शैलीने वाचकांचे तसेच श्रोत्यांचे मनोरंजन केले. क्रिकेट आणि हिंदी चित्रपटसृष्टी या दोन विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि सांस्कृतिक विश्वाचे नुकसान झाले आहे.