
स्टार ११ महाराष्ट न्युज प्रतिनिधी ——-
केळघर.दि .०१ .केळघर ता.जावली येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक श्री शंकर जांभळे गुरुजी व आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे निकटीय कार्यकर्ते सुनील जांभळे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती श्रीपति जांभळे (वय ८० ) यांचेआज सकाळी अल्पशा आजाराने केळघर येथील राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा सदैव हसरा चेहरा आणि त्या सात्विक चेहऱ्यावरील तेज सर्वांसाठी मोठी समाधानाची बाब होती.त्यांच्या जाण्यानं जांभळे परिवारासह केळघर गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.पार्वती जांभळे यांच्या निधनानंतर सातारा जावलीचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व शिक्षक वृंद यांनी शोक व्यक्त केला असून राजकीय तसेच सामाजिक नेते,कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.