सामाजिक

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी गणेश बोतालजी

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–

सातारा. दि . ०१ . डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कोरेगाव येथील संपादक पत्रकार गणेश बोतालजी यांची आज बिनविरोध झाल्याची घोषणा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.

राज्यातील ५ हजारहून अधिक युट्युब चॅनेल व वेब पोर्टलचे संपादक पत्रकार सभासद असलेल्या देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेने डिजिटल मीडियातील संपादक पत्रकारांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडून त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.ज्येष्ठमध्यमतज्ञ संपादक राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ही संघटना मोठ्या ताकतीने कार्यरत आहे.

आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत गणेश बोतालजी यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.या बैठकीसाठीविकास भोसले ,संजय कदम ,सचिन जाधव, सचिन भिलारे ,सोमनाथ साखरे ,संतोष शिराळे, राहुल ताटे पाटील, धनंजय पानसांडे ,संदीप माने , फिरोज तांबोळी,लिंगराज साखरे बापूसाहेब मिसाळ, धनंजय, सचिन शिंगाडे यांची उपस्थिती होती

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!