क्राईम

जावली तालुक्यात अवैध दारू धंद्यांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करून चोवीस गुन्हे दाखल

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

मेढा. दि.०१.     दारूबंदी असलेल्या जावली तालुक्यात अवैध दारुविक्रीचा सुळसुळाट झाल्याने व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दारू धंद्यांवर धाडी टाकून दारूच्या बाटल्या उत्पादन शुल्क मंत्र्यांना भेट देणार असल्याचा इशारा दिला गेला होता त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून गेल्या दोन दिवसात जावली तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांच्या मागे हात धुवून लागला आहे तालुक्यातील एकवीस अवैध मदयविक्रीवर छापे टाकून एकुण चोवीस आरोपी विरूध्द गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण अंदाजे एक लाख पंधरा हजार पाचशे किंमतीच्या देशी दारू, विदेशी दारू, बीअर तसेच ताडीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त विजय सुर्यवंशी,उपआयुक्त विजय चिंचाळकर,यांचे आदेशान्वये सातारा जिल्हा अधीक्षक किर्ती शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सातारा, फलटण, कोल्हापूर, पुणे येथील भरारी पथकांनी जावली तालुक्यात गाड्यांच्या ताफ्यासह तालुका पिंजून काढला जावली तालुक्यात अवैध मदयविक्रीवर छापे टाकून एकुण चोवीस आरोपी विरूध्द गुन्हे नोंद करण्यात आले असून एक लाख पंधरा हजार पाचशे किंमतीचा देशी दारू, विदेशी दारू, बीअर तसेच ताडीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.जावली तालुक्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे

सदर कारवाईत निरीक्षक एस.डी.खरात, एम एस चव्हाण,एम व्ही गायकवाड, दुय्यम निरीक्षक प्रतिक ढाले, जितेंद्र देसाई,के बी नडे,एस एस काळे, श्रीमती के डी यादव,ए व्ही खरात,महेश मोहीते जवान नरेंद्र कलकुटगी, महेश देवकर, शंकर चव्हाण, मनिष माने, आप्पा काळे अजित घाडगे अरूण जाधव,किरण जंगम,आबा जानकर,सुरेश अब्दागिरे यांनी सहभाग घेतला. तसेच जिल्हातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सातारा जिल्हयात बेकायदा परराज्यातील दारू, बनावट दारू,हातभटटी दारूची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन किर्ती शेडगे यांनी केले आहे.

         विलासबाबा जवळ  व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र 

जावली तालुक्यात अवैध दारू धंदे मोठया प्रमाणावर आहेत दारूमुक्त तालुका असूनही हे अवैध दारू धंदे कोणाच्या आश्रयाने सुरू आहेत हे सर्वश्रुत आहे आमच्या इशाऱ्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने धाडी टाकल्या आहेत मात्र या जुजबी कारवायांनी आम्ही समाधानी नाही केवळ केसेस करून दारूधंदे बंद होणार नाहीत तर त्याच्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली पाहिजे आता धाडी टाकल्यात पण तरीही धंदे सुरू आढळले तर आम्ही इशारा दिल्याप्रमाणे स्वतः धाडी टाकून सापडलेल्या दारूच्या बाटल्या उत्पादन शुल्क मंत्र्यांना १५ ऑगस्ट ला भेट देण्याचा कार्यक्रम करणारच,

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!