स्टार ११ महाराष्ट्र अभिजीत शिंगटे
मेढा. दि.१८. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सेवानिवृत्त सभासद यांचे योगदान आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन श्री राजेंद्र घोरपडे यांनी केले.
मेढा येथे महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयातील थत्ते सभागृहात सेवानिवृत्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सेवानिवृत्त सभासद यांना बँकेविषयी आत्मीयता आहे त्यामुळे बँक प्रगतीपथावर असून भविष्यात सेवानिवृत्त सभासद यांनी बँकेच्या वेगवेगळ्या योजनाचा अधिक लाभ घेवुन आपले जीवनमान सुरक्षित करावे.या वेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षक संघाचे माजी चेअरमन साहेबराव साळुंखे,.संचालक शंकर जांभळे,गणेश तोडकर,राजकुमार जाधव,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे,जावली प्राथमिक शिक्षक संघाचे रघुनाथ दळवी, मिलन मुळे तसेच विविध शिक्षक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.बँकेचे संचालक शंकर जांभळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना आपल्या बँकेचे सभासदत्व स्विकारून बँकेच्या प्रगतीचा हातभार लावणाऱ्या प्रत्येक सभासदा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. संचालक गणेश तोडकर यांनी आपली प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सभासदांच्या अडी-अडचणीच्या वेळी धावून येणारी आपली बँक असून मागील सात वर्षापासून संचालक म्हणून काम करताना सभासदांचे हिताचे निर्णय घेता आले यामुळे मी नशिबवान आहे असे सांगितले.
या सेवानिवृत्त सत्कार समारंभप्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक राजकुमार जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे, सभासद बळवंत पाडळे . अशोक लकडे, मिलन मुळे यांनी ही आपल्या भाषणातुन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक नेहमीच आपल्या कार्यात अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करणे कामी बँकेचे प्रभारी शाखाप्रमुख नामदेव जुनघरे आणि सहकारी गणपत धनावडे ,अमन खान,अण्णासो भोसले अभिजीत शिंगटे, अश्विनी शेलार,प्रशांत म्हसकर,तुषार गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सेवानिवृत्त सत्कार समारंभास सेवानिवृत्त सभासद, सभासद, तसेच सेवानिवृत्त शिक्षक परिवार यांची लक्षणिय उपस्थिती होती.



