राजकीय

जावळी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

स्टार ११ महाराष्ट्र

केळघर : जावळी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, भुईमूग यांसह भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जावळी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेचे सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख श्री. एकनाथ ओंबळे यांनी जिल्हाधिकारी संतोषजी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऐन पावसाळ्यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः जावळी तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भात पिकांवरही पावसाअभावी संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेजारील महाबळेश्वर तालुक्यात तुलनेने चांगला पाऊस झाल्याचे नमूद करत, जावळी तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जावळी तालुक्यातील सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

येत्या दोन दिवसांत जावळी तालुका दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. एकनाथ ओंबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!