स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कास. दि.१६. समाजात आपण कितीही मोठे झालो तरी मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची उर्मी व हे करत असताना आपले पाय जमिनीवर असण्याची गरज असते असे प्रतिपादन म्हाते बु. येथील अमेरिकास्थित उद्योजक ज्ञानेश्वर सपकाळ यांनी केले.
मेढा पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सपकाळ यांच्या सौजन्याने मेढा पोलिस ठाण्याचा परिसर सुशोभित करण्यासाठी झाडे लावणे, लाॅन्स टाकणे व ईतर कामे करण्यात आली याबद्दल त्यांचा मेढा पोलिस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने म्हणाले, समाजात दातृत्वाची संख्या कमी होतेय पन ज्ञानेश्वर सपकाळ यांनी स्वताहून पुढे येत पोलिस स्टेशनसाठी काय करता येईल असे विचारून हवी ती मदत दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.
समाजसेवक व उद्योजक विजय सावले, सुर्यकांत पवार, विनोद शिंगटे यांनी ही आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी मेढा पोलिस ठाण्याच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते कलमी आंब्याच्या झाडांचे रोपन करण्यात आले. कार्यक्रमास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, अमेरिकास्थित दाते ज्ञानेश्वर सपकाळ, समाजसेवक विजय सावले, म्हाते गावचे माजी सरपंच हणमंतराव शिंगटे, विनोद शिंगटे, धोंडीराम सपकाळ, संपत सपकाळ, वसंत सपकाळ, शंकर सपकाळ, अलका देशमुख, विजय सपकाळ यांच्यासह मेढा युवक व्यापारी वर्गाचे अजित धनावडे, दीपक धनावडे, प्रथमेश काशीलकर, संकेत करंजेकर, समीर पवार, वैभव करंजेकर, अक्षय जवळ, नामदेव पवार, किशोर वारागडे, मनोज जवळ हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेढा पोलिस स्टेशनचे पीएसआय विकास शिंदे, अमोल पवार,उद्धव शिंदे, नितीन जाधव,नंदकुमार जाधव, स्नेहल घाडगे, शामल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.



