
स्टार ११ महाराष्ट्र – संजय वांगडे (कुसुंबी)
कुसुंबी. दि.२४.पंचायतराज दिनानिमित्त आज मेढा येथील प्राथमिक शाळेमध्ये बाल सभेचे आयोजन करण्यात आले.अभिनव शिक्षण केंद्र सातारा. राष्ट्रसेवा दल शाखा मेढा. मायरा फाउंडेशन यांचे वतीने पदाधिकारी सामील झाले. बाल सभेचे उद्घाटन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, श्री शिंदे सर यांचे हस्ते करण्यात आले.
अभिनय शिक्षण केंद्र आणि मायरा फाउंडेशन ,यांनी या उपक्रमासाठी, आज मेढा प्राथमिक शाळेचे निवड केली,
ग्रामसभा संशिप्त प्रकार असल्याने लहान वयात, मुलांना शिक्षणाबरोबर इतर आवश्यक गोष्टींचा अनुभव या उपक्रमामुळे मिळेल, शिक्षणाबरोबर, मुलांना आपले हक्क कर्तव्य व जबाबदारी चे इतर अनुभव देण्याचा हा राष्ट्र सेवा दलाचा प्रयत्न, आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे.
आपल्या मनोगतामध्ये श्री बाबर म्हणाले,अशाप्रकारे बाल सभेचे आयोजन करून या सभेद्वारे, विविध कमिट्या त्यांचे कामकाज जाणून देण्याचा, अभिनव शिक्षण केंद्र त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मुलांना शिक्षणाबरोबर समाजातील इतर व्यवस्थापनाचे ज्ञान मिळेल,आणि विविध समित्यांच्या कामकाजाची जाणीव होईल.पोलीस ठाणे मार्फत मेढा येथे, निर्भया पथक, महिला दक्षता कमिटी, मोहल्ला कमिटी संवादी पथक, भरोसा सेल, भरारी पथक, पोलीस दादा पोलीस दीदी संवाद पथक ,इत्यादी पथक कार्यरत असून त्याच्या माध्यमातून सर्वांना संरक्षण सेवा उपलब्ध करून दिली जाते.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष श्री पांडुरंग जवळ,श्री शशिकांत कदम , सुलोचना कदम ,वंदना गुरव ,माया जवळ, शिल्पा देशमुख, मगरे मॅडम, सौ कदम मॅडम उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक शिंदे सर यांनी राष्ट्र सेवा दल शाखा मेढा यांचे वतीने वेळोवेळी या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शाळा मेढा येथे व्हावे, असे मनोगतामध्ये आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती शिंदे यांनी केले. आभार जयश्री माजगावकर यांनी मानले.



