महाराष्ट्रसातारासामाजिक

श्री भैरवनाथ विद्यामंदिर केळघर येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

केळघर दि.१६.जावली तालुक्यातील केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. दोन वर्ष covid-19 प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा उघडल्याने विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा एकच किलबिलाट पाहायला मिळाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केळघर गावचे सरपंच रवींद्र सल्लक तर स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र गाडवे व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष यशवंत बेलोशे,प्रमुख पाहुणे उपस्थित होते.विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक वायदंडे डी. एच.म्हणाले मागील दोन वर्षे आपले अतोनात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे भरून काढण्याची संधी आपल्याला यावेळी मिळत आहे. विद्यार्थ्यांनी आळस झटकून आता पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करावी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उत्साही आणि मार्गदर्शनाला तत्पर आहेत. त्यांच्याकडून आपला पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या ज्ञानात भर पाडावी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र सल्लक म्हणाले,आम्ही शाळेत असताना परिस्थिती फार वेगळी होती.मात्र आता तुम्हाला पाठ्यपुस्तके वह्या आणि शालेय साहित्य वेळच्या वेळी उपलब्ध होत आहे. त्यासोबतच अद्ययावत तंत्रज्ञान ही उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही या परिस्थितीचा आणि शिक्षकांचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपले ज्ञान वाढवावे.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सेवकांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वायदंडे डी. एच.यांनी सूत्रसंचालन देवकर एस. के.यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार डी. एम. यांनी केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!