
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा. दि.१८. जावली तालुक्यातील मेढा येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रथमच मेढा शहरातील विरंगुळा सामाजिक व शैक्षणिक संस्था अंतर्गत महालक्ष्मी डान्स स्कूल तर्फे २ दिवसाचे नृत्य कलेचे शिबीर भरवले जाणार आहे.
या नृत्य शिबिरामध्ये हीपोप डान्स स्टाईल तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याचे प्रकार शिकवले जाणार आहेत . नृत्य शिकविण्यासाठी व क्लास घेण्यासाठी खास कोल्हापूर तसेच सातारा येथील uphold dance studio चे प्रशिक्षक राहुल सर आणि रोहित सर हे स्वतः उपस्तिस्थ राहून नृत्याचे विविध प्रकार शिकविणारआहेत.
सदर शिबिर हे ३० व ३१ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे.महालक्ष्मी डान्स स्कूल मेढा यांनी या वेळेस लिमिटेड प्रवेश मर्यादा ठेवलेली असून प्रवेश पास घेणे आवश्यक आहे. तरी आपणास प्रवेश घ्यायचा व शिबिरासाठी उपस्थित राहण्यासाठी पुढे दिलेल्या नंबर संपर्क करून आजच आपले बुकिंग करून घ्या 7507561579/9890232997 या क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करण्या चे आवाहन शिरिष गणेश माजगावकर महालक्ष्मी डान्स स्कूल मेढा यांच्या वतीने करण्यात आली आहे.प्रवेश शुल्क 300 /- असेल नृत्य शिबीरानंतर लगेचच लहान मुलांचे नियमित नृत्य / व्यायाम/ क्लासेस / महिलांसाठी झुंबाचे क्लासेस घेतले जाणार आहेत.
सदर शिबीरचे ठिकाण हे मेढा येथिल नवीन बसस्थानक परिसरात यंग लूक कलेक्शन समोरील इमारतीत तिसऱ्या मजल्यावर शिबीर व क्लासेस घेतले जाणार आहेत.



