महाराष्ट्रसातारासामाजिक

मेढ्यात रस्त्यावरील वाहनांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

         मेढा दि.२१ सातारा महाबळेश्वर रोडवर रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास मेढा पोलीस ठाण्याकडून विरोध करण्यात येत असून पार्कींग सोय नसल्याने वाहनाधारकातुन कारवाईबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

मेढा येथिल बाजारपेठ मुख्य सातारा महाबळेश्वर रोड वर असुन मुख्य रोडवर वाहन पार्किंग करूनच ग्राहक खरेदी साठी बाजारपेठ फेरफटका मारत असतो. बाजारपेठ तशी छोट्या खाणी असुन दोन चार मोठी किराणा दुकाने सोडली तर बाजारपेठेत मंदी आहे. परंतु असे असताना सुद्धा बाजारपेठेत वाहनांची वरदळ आहे.

मेढा हे नगरपंचाचतीचे कार्यक्षेत्र असुन या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत आहेत. पार्किंग , स्वच्छतागृहे याबाबत नगरपंचायत उपाय योजना करताना दिसत नाही परंतु शासन आदेशाची अंमलबजावणी करताना दिसत आहे त्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सुर आहे.

सातारा महाबळेश्वर रोडवर अस्ताव्यस्त पार्किग करणाऱ्या वाहन धारकांवर मात्र मेढा पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असुन रस्त्यावर वाहने न उभी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुख्य रस्त्यावर अजुन पार्किंग चे पट्टे , डिवायडर अपूर्ण आहेत . अजुनही रस्त्याचे दुरुस्ती काम सुरु आहे अशातच पोलिसांनी उगारलेल्या कारवाई बाबत माजी सभापती बापुराव पार्टे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पार्कींगची योग्य दिशा ठरविण्यात यावी अशी मागणी सुद्धा बापूराव पार्टे यांनी केली आहे.

मेढा येथिल पोलीस परेड ग्राऊंड मध्ये वाहने पार्किंग केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी सांगितले . आज अमोल माने यांनी टोचन वाहनासह मुख्य बाजारपेठेत दौरा करून वाहन धारकांना स्पिकरद्वारे सुचना केल्या. त्यामुळे आता रस्त्याकडेला वाहन उभे करताना पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ट्रॅफीक पोलीसांच्या सुचनाकडे ही वाहन धारक दुर्लक्ष करताना दिसत असल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल माने यांनी आज प्रत्यक्ष कारवाईची मोहीम उघडून वाहन धारकांना वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे त्याला वाहन धारक किती सहकार्य करताना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!